pune solapur national highway cause accidents due to road work material
pune solapur national highway cause accidents due to road work material sakal
पुणे

Pune News : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीमुळे वाहतुकीला धोका

कृष्णकांत कोबल

मांजरी : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर रवीदर्शन ते कवडीपाट टोलनाका या सुमारे पाच किलोमीटर अंतराचे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून डांबरीकरणचे ( डीबीएम) काम सुरू आहे.

मात्र, ठेकेदाराकडून हे काम निकृष्ट व अशास्त्रीय पध्दतीने केले जात आहे. त्यामुळे काम झालेल्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बारीक खडी रस्त्यावर पसरली असून त्यावर वाहने घसरून छोटेमोठे अपघात होत आहेत.

मागील महिन्यापासून येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर येथील रवीदर्शन ते कवडीपाट टोलनाका परिसरात टप्याटप्याने डांबरीकरणाच्या डीबीएमचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम होत आहे, त्याठिकाणाहून वाहतूक सुरू होताच मोठ्याप्रमाणात बारीक खडी बाहेर येत आहे. वाहनांच्या टायरने ही खडी संपूर्ण रस्त्यावर पसरत आहे.

पसरलेल्या या खडीवरून दुचाकी वाहने घसरत आहेत. त्यातून छोटेमोठे अपघात होत आहेत. चारचाकी हलकी वाहनेही घसरून मार्ग सोडत आहेत. काम सुरू असतानाच पाठीमागे डांबरीकरण उखडले जात असल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांडून शंका व्यक्त केली जात आहे.

याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी आशिष गायकवाड, नितीन भुजबळ, नंदकुमार सायकर, अलका गायकवाड, सागर बहिरट, संजय घुले, आकाश मोरे, आशिष आर्डक यांनी केला आहे.

"महामार्ग चांगल्या स्थितीत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम झालेले असताना राष्ट्रीय महामार्ग त्यावर नव्याने डांबरीकरण करून लाखों रुपये वाया घालवत आहे. जे होत आहे ते कामही निकृष्ट आहे. साईडपट्ट्यांचे काम होण्याची मोठी गरज आहे. त्याकडे मात्र कित्येक महिन्यांपासून दुर्लक्ष होत आहे. सध्या होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. जखमींना व वाहनांची नुकसानभरपाई द्यावी.'

- राहुल शेवाळे माजी उपसरपंच, शेवाळेवाडी ग्रामपंचायत

"डीबीएमचे काम झाल्यानंतर त्याचे सेटिंग होणे आवश्यक आहे. त्यासाठी लावलेल्या बॅरिकेट्सकडे दुर्लक्ष करून त्यावरून अवजड वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे झालेले डांबरीकरण उखडत आहे. मात्र, त्याठिकाणी तात्काळ डांबरीकरण केले जात आहे. साईडपट्ट्यांचे कामही केले जाणार आहे. कामाचा दर्जा चांगला असून ते नियमानुसारच केले जात आहे.'

- अतुल सुर्वे शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT