दुचाकीला धडक sakal
पुणे

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक

अपघात मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला आहे.

सावता नवले/प्रफुल्ल भंडारी

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली ( ता. दौंड ) हद्दीत भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार एक जखमी झाला. अपघात मंगळवारी ( ता. 30 ) पहाटे दीडच्या सुमारास घडला आहे.

स्वामी चिंचोली हद्दीतील सोनारनाल्याजवळ पुणे सोलापूर महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला ( एमएच. 08, एडब्लु. 4890 ) धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक राजू दिगंबर जुड़े ( वय 24, सध्या रा. चिपळूण, जि. रत्नागिरी ) त्यांच मूळगाव साळीत उपखंड हे आहे. हे गंभीर जखमी झाल्याने ठार झाले. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले

बुध्दभूषण दिंगबर दामोदर ( वय 21, सध्या. रा. पुणे तर मूळगाव मु. अंबाळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ ) हे जखमी झाले. याप्रकरणी बुध्दभूषण दामोदर यानी पोलिसात फिर्याद धिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील भरधाव निष्काळजीपणे चालवून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून राजू जुडे यांच्या मृत्यूस व बुध्दभूषण दामोदर याला जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 279, 337, 388,304,427 व मोटर वाहन कायदा 134,179,184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT