murder esakal
पुणे

Crime : दवाखान्याचा खर्च परवडत नसल्यामुळे वडिलांकडून मुलाचा खून

दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे वडिलाने आजारी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर काळेपडळ परिसरात मध्यरात्री घडली.

प्रशांत पाटील

दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे वडिलाने आजारी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर काळेपडळ परिसरात मध्यरात्री घडली.

पुणे - दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे वडिलाने आजारी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर काळेपडळ परिसरात गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री घडली. हडपसर पोलिसांनी वडिलाला अटक केली आहे.

अभिजित बाबूराव जायभाय (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आई सुनीता बाबूराव जायभाय (वय ४५) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाबूराव दिनकर जायभाय (वय ५०, रा. केतकेश्वर कॉलनी, काळेपडळ, तुकाई टेकडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित जायभाय याला सहा महिन्यांपूर्वी डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला कोणतेही काम करता येत नव्हते. तो बेडवरच झोपून असायचा. त्याची आई सुनीता ही घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तर, वडील बाबूराव जायभाय हा हमालीचे काम करतो. बाबूराव याला दारुचे व्यसन असून, तो घरखर्चासाठी पैसे देत नव्हता.

आजारी मुलाला ‘तुझा जगून काही उपयोग नाही. काही कामधंदा करीत नाही’, असे तो वारंवार बोलत असे. दवाखान्यातील उपचाराचा खर्च वाढत असल्याचा राग मनात धरून वडिलाने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलाचा गळा आवळून खून केला. याबाबत मुलाच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT