pune  sakal
पुणे

Pune : ॠषिपंचमीला निनादले ‘ओम नमस्ते गणपयते’चे स्वर

दगडूशेठ हलवाई मंदिरात अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपती मंदिरात ‘ओम नमस्ते गणपतये...’चे स्वर निनादले. कोरोनामुळे यंदा सलग दुस-या वर्षी दगडूशेठच्या मुख्य मंदिरात पाच महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण झाले. मात्र हजारो भाविकांनी आॅनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुभांगी भालेराव यांसह अर्चना भालेराव, जयश्री शेळके, प्रेरणा देशपांडे, ज्योती देशमुख, स्नेहा परांजपे या पाच महिलांनी मुख्य मंदिरातून त्यात प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १२ वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गणेश वंदना, दाही दिशांनी तम लोपवा प्रथमेशा जग जागवा... हे गीत सादर झाले. त्यानंतर गजर व आरती झाली. मंदिरात उपस्थित महिलांसह आॅनलाईन पद्धतीने उपस्थित भाविकांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष पठण केले.

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिराबाहेरुन दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. भक्तांनी उत्सवकाळात गर्दी करू नये. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाइट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

ऑनलाईन दर्शनासाठी

www.dagdushethganpati.com या संकेतस्थळावर क्लिक करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT