Admission esakal
पुणे

Pune : डी.एल.एड अभ्यासक्रमाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरी जाहीर

गुरुवारपासून सुरू होणार प्रवेश फेरी

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - राज्यातील अध्यापक महाविद्यालयात शासकीय कोट्यातील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी येत्या गुरुवारपासून (ता.३) विशेष फेरी आयोजित केली आहे.

या फेरीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने ऑनलाइन प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.

राज्यातील अध्यापक विद्यालयातील डी.एल.एड. अभ्यासक्रमासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यास शिक्षण आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

त्यानुसार परिषदेने या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी उत्तीर्ण झालेले आणि नव्याने प्रवेश अर्ज भरण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी, नियमित प्रवेश प्रक्रियेत अर्ज पूर्ण न भरलेले असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत.

या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी कोठेही अर्ज करू शकतो आणि प्रवेश घेऊ शकतो, असे काठमोरे यांनी स्पष्ट केले आहे.

डी.एल.एड प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विशेष फेरीचे वेळापत्रक -

तपशील : कालावधी

- विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे : ३ ते ७ ऑगस्ट

- पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाइन पडताळणी करणे : ३ ते ८ ऑगस्ट

- पडताळणी केलेल्या अर्जात दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी दुरुस्ती करणे,

दुरुस्ती केलेल्या अर्जांची अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पडताळणी करणे  : ३ ते ९ ऑगस्ट

- विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेणे : ३ ते १० ऑगस्ट

- अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून ऑनलाइनद्वारे प्रवेश देणे : ३ ते १४ ऑगस्ट

अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ - www.maa.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT