SSC HSC Exam Result esakal
पुणे

SSC Exam Result : पुणे विभागीय मंडळातील ९५.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; पुणे आणि सोलापूर जिल्हा अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातील दोन लाख ५८ हजार ७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातील दोन लाख ५८ हजार ७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ४७ हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेच्या निकालाची टक्केवारी ९५.६४ आहे. राज्यातील एकूण निकालाच्या टक्केवारीत पुणे विभागीय मंडळ तिसऱ्या स्थानावर आहे.

या परीक्षेसाठी पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ३२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील दोन लाख ५८ हजार ७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पुणे विभागीय मंडळात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे ११ हजार ४४१ विद्यार्थी आहेत. सात हजार ५४७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात चार हजार ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेच्या निकालाची टक्केवारी ६४.३१ आहे. पुणे विभागीय मंडळातील एक विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

पुणे आणि सोलापूर विभागात पहिल्या स्थानावर

विभागीय मंडळात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ९६.०६ टक्के नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नगर जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.४८ आहे. तर पुणे विभागीय मंडळातील ९५.६४ नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे विभागीय मंडळातील दहावीच्या निकालातील आकडेवारी (नियमित विद्यार्थी) :

जिल्हा : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : १,२८,६६० : १,२८,११७ : १,२३,०७१ : ९६.०६

नगर : ६८,३७१ : ६७,८७४ : ६४,१३२ : ९४.४८

सोलापूर : ६३,२९६ : ६२,८०२ : ६०,३२८ : ९६.०६

एकूण : २,६०,३२७ : २,५८,७९३ : २,४७,५३१ : ९५.६४

टक्केवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या :

टक्केवारी : विद्यार्थ्यांची संख्या

९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ११,४४१

८५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १९,४५३

८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : २६,२८९

७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : २९,८०२

७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ३१,५८९

पुणे शहर परिसरातील निकालाची आकडेवारी (नियमित) :

परिसर : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

हवेली तालुका : १३,४४९ : १३,३९८ : १२,८५७ : ९५.९६

पुणे शहर (पश्चिम) : १८,९७० : १८,९०० : १८,१२१ : ९५.८७

पुणे शहर (पूर्व) : २३,१८३ : २३,०७० : २२,०१६ : ९५.४३

पिंपरी-चिंचवड : १९,२८२ : १९,२३२ : १८,६०२ : ९६.७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT