attack esakal
पुणे

Pune Crime : वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून भावावर हत्याराने वार

वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून भावावर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून भावावर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पुणे - वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून भावावर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना न्यू नाना पेठेतील रोशन अपार्टमेंटमध्ये बुधवारी (ता. १) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

मतीन हशम सय्यद असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मतीनचा मोठा भाऊ अन्वर हशम सय्यद (वय ५५, रा. नाना पेठ, सध्या रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून जाफर हशम सय्यद (वय ४५) याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्वर आणि त्यांचा भाऊ जाफर यांच्यात वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. बुधवारी सायंकाळी अन्वर आणि लहान भाऊ मतीन हे दोघे त्यांच्या दुकानात काम करीत होते. त्यावेळी आरोपी जाफर हा त्याठिकाणी आला. ‘तुला खूप दिवसांपासून समजावून सांगतो, परंतु तू समजत नाहीस. माझा वडिलांच्या मिळकतीमधील हिस्सा दे’, असे म्हणत जाफर याने मतीनच्या मानेवर हत्याराने वार केले. त्यात मतीन हा गंभीर जखमी झाला. तसेच, आरोपीने फिर्यादीच्या मुलालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT