pune municipal corporation sakal
पुणे

पुणे : मतदार यादीवरील हरकतीचा शोध घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली आहे.

पुणे - प्रारूप मतदार यादीत भयंकर चुका असल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले होते. त्यावर हरकतींचा पाऊस पडल्यानंतर आता त्या हरकतीनुसार पत्ता शोधून पडताळणी करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. पण सदोष मतदार यांद्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे. आत्तापर्यंत २ हजार ८०० हरकतींची पडताळणी झाली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभागाची मतदारयादी निश्‍चीत करण्यासाठी प्रारूप मतदारयादी जाहीर केली. त्यावर राजकीय पक्ष, नागरिक, इच्छुक उमेदवारांनी सुमारे ४ हजार ७०० हरकती नोंदविलेल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून त्याचा अहवाल ९ जुलै पर्यंत सादर करा असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते, पण हरकतीचे प्रमाण जास्त असल्याने महापालिकेने मुदतवाढ मागितली होती, त्यानुसार आता १६ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

प्रारूप यादीत मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत, बोगस मतदारांची संख्या मोठी आहे, या तक्रारी प्रामुख्याने होत्या. या प्रत्येक तक्रारीची जागेवर जाऊन पाहणी करावी लागते. यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास २५ कर्मचारी नियुक्त केले असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ४ नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून शहरात पाऊस पडत असल्याचा परिणाम या पडताळणीवर झाला आहे. या कामासाठी नियुक्त केलेले काही कर्मचारी आजारी पडले आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीचे आदेश देत या कामासाठी हवे तेवढे कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक शाखेचे उपायुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘विधानसभेच्याच मतदार यादीत चुका असल्याने आता हरकतींची पडताळणी करताना अडथळे येत आहेत. विधानसभेचे मतदान केंद्र आणि आताच्या मतदान केंद्राची तुलना करून पडताळणीचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत २ हजार ८६२ हरकतींची पडताळणी झाली आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT