Transfer  esakal
पुणे

Pune : राज्यातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील इतर बदली झालेले अधिकारी व त्यांचे कंसात नवीन बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे- कीर्ती नलावडे- जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा,

(सहाय्यक आयुक्त (मावक), पुणे), मिनाज मुल्ला -उपविभागीय अधिकारी सातारा, (उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर,), विजयसिंह पाटील- निवासी उपजिल्हाधिकारी सांगली, संतोष कुमार देशमुख- उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूर, गीतांजली शिर्के यांची उप जिल्हाधिकारी पुणे, नागरी समूह याच पदावर एक वर्षासाठी नियुक्ती झाली आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यांची नोंदणी उपमहानिरीक्षक, संगणक, पुणे या पदावर तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT