msrtc ST  Sakal
पुणे

Pune: राज्य परिवहन महामंडळ : दररोज २५ लाख प्रवाशांची घट;ग्रामीण भागात ‘एसटी’ मिळेना

त्यामुळे शहरी भागातील प्रवाशांनी एसटीला रामराम ठोकला आहे, तर गाड्यांची संख्या कमी असल्याने एसटी प्रशासनाने ग्रामीण भागातील बहुतांश मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

प्रसाद कानडे

पुणे - राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, अजूनही प्रवासी संख्येत दररोज सुमारे २५ लाख प्रवाशांची घट आहे. शहरी भागात धावणाऱ्या एसटी गाड्यांची स्थिती खराब आहे.

त्यामुळे शहरी भागातील प्रवाशांनी एसटीला रामराम ठोकला आहे, तर गाड्यांची संख्या कमी असल्याने एसटी प्रशासनाने ग्रामीण भागातील बहुतांश मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या आहेत.

शहरांत प्रवासी मिळेना अन ग्रामीण भागात एसटी मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका प्रवासी आणि एसटी प्रशासनालाही बसत आहे.

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती व बस गाड्यांची स्थिती खराब आहे. एकूण १८ हजार गाड्यांपैकी सध्या केवळ सुमारे १२ हजार बस धावत आहेत.

सुमारे पाच हजार एसटी गाड्यांचे आयुर्मान संपल्याने त्यांना प्रवासी सेवेतून बाहेर काढले आहे.

तर एक हजार गाड्या देखभाल-दुरुस्ती, आरटीओ, पोलिस व अन्य तांत्रिक कामांमुळे रस्त्यावर धावत नाही. म्हणजे सुमारे सहा हजार गाड्या प्रवासी सेवेत नाहीत.

त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ग्रामीण भागात कमी उत्पन्नाच्या मार्गावर फेऱ्यांची संख्या कमी केली आहे. त्याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना बसत आहे.

३३ लाख (५८ लाख)

दैनंदिन प्रवासी संख्या

१६ कोटी (२२ कोटी)

प्रवासी उत्पन्न

२६ कोटी (२५ कोटी)

दैनंदिन खर्च

१३ हजार (१८ हजार)

एसटी बसची संख्या

पुणे विभागाची स्थिती....

१ लाख

प्रवासी संख्या

८५ लाख

प्रवासी उत्पन्न

८४९

एसटी बसची संख्या

२,५०,००० किमी

रोजची वाहतूक

का दुरावले प्रवासी?

  • संपाच्या काळात सेवा बंद

  • प्रवाशांना खासगी वाहनांने प्रवासाची सवय

  • एसटी बसचा दर्जा खालावला

  • खराब गाड्यांतून प्रवास त्रासदायक

  • तिकीट दरात १८ टक्के वाढ

  • खासगी वाहतुकीचे दर एसटीच्या

    तुलनेत स्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT