Platform Ticket Sakal
पुणे

प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढणार?

मुंबईच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनानेदेखील पुणे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्याच्या विचार केला आहे. तसा प्रस्तावदेखील स्टेशन संचालकाकडून देण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनानेदेखील पुणे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्याच्या विचार केला आहे. तसा प्रस्तावदेखील स्टेशन संचालकाकडून देण्यात येत आहे.

पुणे - मुंबईच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनानेदेखील पुणे स्थानकावरचे (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर (Platform Ticket Rate) वाढविण्याच्या विचार केला आहे. तसा प्रस्तावदेखील स्टेशन संचालकाकडून देण्यात येत आहे.

गर्दीच्या हंगामात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांना एसीपी (अलार्म चेन पुलिंग) केले जाते. त्यामुळे रेल्वेचे होणारे आर्थिक नुकसान प्रवाशांकडून वसूल करण्यासाठी रेल्वे ही दरवाढ करू शकते. मुंबई रेल्वे विभागाने ‘सीएसएमटी’सह अन्य पाच स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करून ते पन्नास रुपये केले आहे. पुणे स्थानकावर देखील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये होऊ शकते.

पुणे स्थानकांवर रोज किमान तीन ते चार रेल्वे साखळी ओढून थांबविल्या जातात. आरपीएफ या संदर्भात गुन्हे दाखल करून कारवाईदेखील करते मात्र तरीही साखळी ओढून रेल्वे थांबविण्याच्या प्रकारात घट झालेली नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन रेल्वेचा होणारे आर्थिक नुकसान वसूल करण्यासाठी प्रवाशांच्या खिशातच हात घालत आहे. काही प्रवाशांच्या चुकीची शिक्षा प्लॅटफॉर्मवर नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागणार आहे. तब्बल पाचपट रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.

..तर ४० हजार रुपयांचे नुकसान

धावती रेल्वे जर साखळी ओढून थांबवली तर रेल्वेचे किमान चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान होते. यात डब्यांच्या संख्या किती आहे यावर नुकसानीचा आकडा ठरतो. गाडीला सुरुवातीचा वेग घेण्यासाठी किमान १५ मिनिटांचा वेळ जातो. त्याचा परिणाम पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावरदेखील होतो. त्यामुळे चैन ओढून रेल्वे थांबविण्याचे नुकसान जास्त आहे.

वाढत्या गर्दीचा आणि एसीपीचा विचार करता पुणे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविणे गरजेचे आहे. याबाबत ठोस निर्णय घेतला नसला तरीही या संबंधीचा प्रस्ताव देत आहे.

- सुरेशचंद्र जैन, स्थानक संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

Premium|AI and Sustainability History : ‘एआय’ आणि शाश्वत विकास; पृथ्वी वाचवणारे अस्त्र की मानवी रोजगारावर कुऱ्हाड?

SCROLL FOR NEXT