पुणे

सकाळ संवाद

CD

सकाळ संवाद
- - - - - - - - -- - -
शहरातील भटक्या श्वानांचा
महापालिकेने बंदोबस्त करावा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत आहेत. अनेक नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेतीच्या संरक्षणासाठी कुत्र्यांची आवश्यकता असते, परंतु शहरातील गल्ली-बोळांमध्ये भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना उपद्रवच अधिक होत आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर भुंकणे, पाठलाग करणे तसेच चावा घेण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा स्थानिक रहिवासी ‘काही करत नाहीत’ असे सांगतात; परंतु ज्यांच्यावर कुत्री धावून जातात, त्या व्यक्तीची मानसिक अवस्था काय होत असेल याचाही विचार होणे आवश्यक आहे.
-विलास कुलंगे, कसबा पेठ
- - - - - - - - - - - - -
मेट्रोचा मार्गदर्शक फलक
प्रशासनाने पूर्ववत करावा
नारायण पेठेतील पत्र्यामारुती चौकातील मेट्रोचा मार्गदर्शक फलक मागील दोन महिन्यांपासून उलटा झाला आहे. आता तो निसटून खाली आला आहे. जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता एका मुलाला मदत करा ऑपरेशनसाठी रू. दहा कोटी अशा बोगस पत्रक त्यावर लावले आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी हा फलक काढून टाकावा किंवा पूर्ववत उंचीवर सरळ करून लावावा, याचा विचार त्वरित करावा.
-हरीश कावतकर, नारायण पेठ
----------------------------------
कर्वे रस्त्यावर पहिल्याच पावसात
वाहिन्या स्वच्छतेच्या का-माचा फज्जा
कोथरूड- कर्वे रस्त्यावरील इराणी कॅफेच्या पुढे कालच्या पावसात वाहिनी तुंबल्याने चेंबरमधून पाणी रस्त्यावर वाहत होते. परिणामी छत्रपती शाहूमहाराज चौकात पाण्याचे तळे साचले होते. पावसाळापूर्व वाहिन्या, चेंबर, नाले सफाईच्या कोट्यवधींच्या निविदा काढल्या, परंतु ही सफाईची कामे योग्य रितीने झाली नाहीत हेच यावरून सिद्ध होते. या चेंबरच्या पुढील वाहिनी बंद असल्याने चेंबरमधून पाणी रस्त्यावर वाहत होते. गेल्या वर्षीही हीच वाहिनी तुंबून पाणी रस्त्यावर येण्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. तरीही याबाबत कोणतीच दक्षता घेण्यात आली नाही. महापालिकेने येथे तत्काळ पाहणी करून ही वाहिनी पूर्णपणे साफ करून संभाव्य मोठ्या पावसात होणारी पाणी तुंबण्याची घटना टाळावी, तसेच सर्व पावसाळापूर्व कामांची तपासणी केल्याशिवाय देयके अदा करू नयेत.
-शिवाजी पठारे, कोथरूड
-----------------------------
लोकमान्यनगर जॅागिंग पार्ककडे
जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा उचलावा
शास्त्री रस्त्याकडून नवीपेठ लोकमान्यनगर जॅागिंग पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर वरीलप्रमाणे कचरा नेहमीच टाकला जातो व तो वेळेवर उचलला जात नाही, त्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. डास, चिलटांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. तरी महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी दखल घ्यावी.
एन. विलास, नवी पेठ
- - - - - - - - - -
पौड रस्त्यावरील खड्डा बुजवावा
पौड रस्त्यावर शिवनेरी बस थांबा आणि कोथरूड पोलिस ठाण्याच्या वळणावर हा पाइपमुळे झालेला खड्डा बुजविण्याची जबाबदारी महापालिका घेईल का? सकाळी सकाळी आमच्या समोर दोन शाळकरी मुलींचा पाय त्यात अडकून पडल्या. महापालिकेने तातडीने खड्डा बुजवावा.
-प्रशांत कुलकर्णी, कोथरूड
----------------------
आंबेगावातील सांडपाणी वाहिनीचे
काम निकृष्ट दर्जाचे
आंबेगाव खुर्दमधील विठ्ठलनगर कमानीसमोर साचणारे पावसाचे पाणी निचरा न होता तिथेच तुंबून राहते, मात्र पुणे महापालिकेने ७० लाखांहून अधिक रुपये खर्च केले तरी परिस्थितीत काही बदल झालेला नाही. गेली ७ वर्षे ही परिस्थिती कायम आहे. या वर्षीचा पावसाळा तरी सुखकारक व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
-चंद्रकांत गुरव, आंबेगाव खुर्द
- - - - - - - - - - - - - - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Crime News: कोर्याची सीमा! मामानं ९ महिन्यांच्या भाचीला घरातून उचलून नेलं, नंतर घडवलं घृणास्पद कृत्य; शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Latest Marathi News Live Update : कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट

बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

SCROLL FOR NEXT