stress sakal
पुणे

मनावर ताण असेल तर इतरांसोबत मन मोकळे करा; मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला

मनावर कोणताही ताण असेल तर पहिल्यांदा इतरांसासोबत आपले मन मोकळे करा. संकटात संकोच न बाळगता इतरांची मदत घ्या.

सकाळ वृत्तसेवा

मनावर कोणताही ताण असेल तर पहिल्यांदा इतरांसासोबत आपले मन मोकळे करा. संकटात संकोच न बाळगता इतरांची मदत घ्या.

पुणे - मनावर कोणताही ताण असेल तर पहिल्यांदा इतरांसासोबत आपले मन मोकळे करा. संकटात संकोच न बाळगता इतरांची मदत घ्या. आपल्याला कोण काय म्हणेल, याकडे दुर्लक्ष करा. वास्तविकतेचे भान ठेवा आणि आर्थिक बाबतीत झेपेल तेवढेच अंगावर घ्या, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या कौटुंबिक ताण आणि आर्थिक अडचणींमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. औंधमध्ये एका आयटी अभियंत्याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अरुणा कुलकर्णी म्हणाल्या, कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अडचणीत असल्यास वागण्यात फरक पडतो. त्याचे नैराश्यात रुपांतर होऊ शकते. सध्या घराचा, गाडीचा हप्ता यांचे टेन्शन असते. परंतु वास्तविकतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक किंवा पती-पत्नीमध्ये वाद असल्यास ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करावा. वेळीच समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

वेळेवर मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. जवळच्या व्यक्तीसोबत मन मोकळे करा. आर्थिक संकट हे सर्वांनाच आहे. परंतु त्यातूनही एखादा व्यवसाय किंवा नोकरी करून पैसा कमवता येतो. परंतु मानसिक आरोग्य हे महत्त्वाचे आहे. अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ शिवनारायण खांडरे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT