admission  sakal
पुणे

Pune College Admission : अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात

अखेर उशिरा का होईना सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune College Admission - बहूप्रतिक्षीत असलेली राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अखेर वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून या संबंधीच माहिती देम्यात आली असून, विद्यार्थ्यांना शनिवार (ता.२४) जूनपासून अर्ज करता येणार आहे.

एमएच-सीईटीचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर लगेचच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, दोन आठवडा विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागली. राज्यातील खाजगी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठीच सीईटीसेल कडून प्रवेशास विलंब केला जात असल्याचा आरोप होत होता.

यासंबंधीचे वृत्तही सकाळमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. अखेर उशिरा का होईना सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ३ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्रातील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये नोंदणी शुल्क असून आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क आहे .तर एनआरआय, पीआयओ कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये शुल्क आहे.

महत्त्वाच्या तारखा.

- प्रवेश नोंदणी - २४ जून ते ३ जुलै

- कागदपत्रांची तपासणी - २४ जून ते ४ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best FD Investment: RBI च्या निर्णयानंतर 1 लाखासाठी कोणती FD फायद्याची? शॉर्ट टर्म की लॉन्ग टर्म? पाहा संपूर्ण गणित

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

रितेशच्या जाळ्यात अडकणार 'कमळी'? तर स्वतःच्याच घरात 'तारिणी' शोधणार शत्रूचा चेहरा; झी मराठीच्या टॉप २ मालिकांमध्ये पुढे काय घडणार?

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

पत्नीचा पगार १ लाख, तरी महिना ४० हजार पोटगी द्यावी लागणार; पुणे कोर्टाचा पतीला दणका

SCROLL FOR NEXT