pune student education personality Development college effectiv communication skills Sakal
पुणे

Personality Development : उच्च शिक्षण घेतानाच जीवन कौशल्याचे धडे!, पदवीपूर्व स्तरावर अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार

प्रभावी संवादशैली, व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचेही धडे दिले जातील. जीवनाशी निगडित जीवन कौशल्यांचा समावेश असणारा ‘जीवन कौशल्य २.०’ हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल.

सकाळ डिजिटल टीम

Personality Development - विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत महाविद्यालयांतच शिकविले जात. यापुढील काळात उच्च शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना मानवी जीवन मूल्ये, नेतृत्व-व्यवस्थापन कौशल्य, प्रभावी संवादशैली, व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचेही धडे दिले जातील. जीवनाशी निगडित जीवन कौशल्यांचा समावेश असणारा ‘जीवन कौशल्य २.०’ हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल.

देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांत पदवीपूर्व स्तरावर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्यांचे धडे देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार सर्व विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची निवड पर्यायी विषय म्हणून करता येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही अशी शिफारस आहे. त्यानुसार २०१९ मध्ये जीवन कौशल्य अभ्यासक्रम विकसित केला होता. आता नव्या धोरणानुसार या अभ्यासक्रमात सुधारणा केली असून सुधारित अभ्यासक्रम आणि मार्गदर्शक सूचना आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत.

अभ्यासक्रमात आता डिजिटल साक्षरता, सोशल मीडिया, डिजिटल नैतिकता, वैयक्तिक अर्थ व्यवस्थापन, घटनात्मक मूल्ये, न्याय आणि मानवी हक्क अशा घटकांचा अभ्यासक्रमात नव्याने समावेश केला आहे.

चार प्रमुख आधारस्तंभ

  • संवाद कौशल्ये

  • व्यावसायिक कौशल्ये

  • नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये

  • वैश्विक मानवी मूल्ये

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

चार प्रमुख भागात विभागलेला अभ्यासक्रम असेल

प्रत्येक भागाला दोन श्रेयांक आणि संपूर्ण अभ्यासक्रमाला आठ श्रेयांक असतील

चार प्रमुख भागांची विभागणी ३३ पाठांमध्ये

मूलभूत जीवन कौशल्य शिकविण्यावर असेल भर

‘विद्यार्थी एखादा अभ्यासक्रम पूर्ण करतो. परंतु त्यानंतर नोकरीचा शोध घेताना मुलाखती, प्रत्यक्ष नोकरी करत असताना त्यांचे संवाद आणि व्यावसायिक कौशल्य कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्याशिवाय काही मोजक्याच विद्यार्थ्यांकडे कौंटुबिक परंपरेमुळे नेतृत्व गुण आढळतात.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पदवीचे शिक्षण घेत असतानाच ‘जीवन कौशल्ये’ शिकणे आवश्यक आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘जीवन कौशल्य २.०’ हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम संस्थेतील सर्व महाविद्यालयात सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.

- डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT