पुणे

खाणावळी बंद झाल्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांचे हाल 

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे - प्रशासनाने खानावळी, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्यास बंदी घातल्यामुळे जेवायचे कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खोलीवर खाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. तर पार्सल नेण्यासाठी अधिकचे दहा रुपये मोजावे लागत आहे. नक्की हे पार्सल घेऊन खायचे कुठे? असा सवाल विद्यार्थ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. 

शनिवारपासून शहरातील खाणावळी आणि हॉटेलमध्ये खाण्यास बंदी घातली असून, फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. पर्यायाने स्पर्धा परिक्षेसाठी पुण्यात थांबलेले, विविध महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहे. प्रतीक वाकचौरे सांगतो,‘‘आज दुपारच्या जेवणासाठी वेगळेच दिव्य करावे लागले. खाणावळीतून पार्सल घेऊन आम्ही जवळच असलेल्या मित्राच्या रूमवर ते खाल्ले. संध्याकाळी परत पार्सल वेळेवर मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे.’’ निदान विद्यार्थ्यांनातरी खाणावळीत जेवणाची व्यवस्था असायला हवी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच प्रवासी नागरिक, खाणावळीवर अवलंबून असणारे मजूर आणि कर्मचारी यांना मोठ्या प्रामाणावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

विद्यार्थी म्हणतात... 
- पार्सल घेवुन खाण्याची व्यवस्था नाही 
- पार्सलसाठी अधिकचे पाच ते दहा रुपये मोजावे लागतात 
- संध्याकाळी सहा नंतर संचारबंदी असल्यामुळे खाणावळी लवकर बंद होतात 
- खाणावळींवर वेळेचे निर्बंध लादल्यामुळे गर्दी वाढते 
- विद्यार्थ्यांना तरी तेथे जेवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी 
- खाणावळींचा वेळ वाढवावा 

गेली वर्षभर आमचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता कुठे पूर्वपदावर येत आहे तर पुन्हा एकदा निर्बंध लादण्यात आले आहे. या निर्बंधामुळे आमच्या रोजच्या खाण्यापिण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पार्सलद्वारे जेवण करणे आमच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. 
- वर्षा जगधने, विद्यार्थिनी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT