Pune News  sakal
पुणे

Pune News : उपनगरांमध्ये अघोषित पाणीकपात ; पाणी सोडणाऱ्यांना सोसायट्यांकडून हवे लाखाचे ‘बक्षीस’

पुण्यातील उपनगरांना आतापासूनच पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. तेथील गृहनिर्माण संस्थांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्यापासूनच पाणी नावापुरते सोडले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील उपनगरांना आतापासूनच पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. तेथील गृहनिर्माण संस्थांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्यापासूनच पाणी नावापुरते सोडले जात आहे. त्यामुळे अधिकृत नाही पण अघोषित पाणीकपात अशी स्थिती निर्माण होऊन नागरिक त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्याच आठवड्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील

उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेण्यात आली.

त्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्यात कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु शहरासाठी येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका साठा राखीव ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा पुणे शहर आणि शेतीसाठी काटकसरीने वापर करण्याबाबतचा आदेश अजित पवार यांनी दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी फक्त उपनगरांमध्येच का, असा सवालही उपनगरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरमहा मोजा एक लाख

अशा स्थितीत पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘भाव’ वाढला आहे. समाधानकारक पाणीपुरवठा हवा असेल तर हे कर्मचारी ‘बक्षीस’ म्हणून महिन्याला किमान एक लाख रुपयांची रक्कम मागू लागले आहेत, अशी तक्रार उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, आंबेगाव आदी भागांतील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

पाण्याच्या बजेटमध्ये दुपटीने वाढ

विविध उपनगरांमधील सोसायट्यांना महापालिकेने केवळ नावालाच नळजोडणी दिली आहे. तेथे आधीपासूनच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणीपुरवठा केला जात नाही. परिणामी सोसायट्यांना पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. मोठ्या सोसायट्यांना फक्त पाणी खरेदीसाठी दर महिन्याला किमान अडीच ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. अशा सोसायट्यांचे पाणी खरेदीसाठीचे फेब्रुवारीतील बिल दुप्पट झाल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Latest Marathi News Update : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरे

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

SCROLL FOR NEXT