temperature increase sakal
पुणे

Summer : उन्हाचा चटका पुन्हा वाढणार

आठवडाभरापासून ढगाळ असलेले वातावरण आता निवळले असून, दिवसा उन्हाची तिव्रता वाढत चालली आहे.

सकाळ वृत्तसेवा

आठवडाभरापासून ढगाळ असलेले वातावरण आता निवळले असून, दिवसा उन्हाची तिव्रता वाढत चालली आहे.

पुणे - आठवडाभरापासून ढगाळ असलेले वातावरण आता निवळले असून, दिवसा उन्हाची तिव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात पुढील तीन दिवस उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.

शहरातील कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आकाश दिवसभर अंशतः ढगाळ होते. मात्र, कोठेही पावसाची नोंद झाली नाही. तसेच दिवसभरात उन्हाचा कडाकाही चांगलाच जाणवत होता.

राज्यातही आता विविध भागात सुरू असलेल्या वादळी पावसाने उघडीप दिली आहे. मंगळवारी (ता. २१) विदर्भात विजांसह पावसाचा शक्यता कायम आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर राज्यात उन्हाचा चटका वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे.

दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू ते छत्तीसगड पर्यंत विस्तारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT