पुणे

रमेश दामले स्मृती जलतरण स्पर्धा

CD

फोटो ः श्रीलेखा पारिख
कैजा शंकर
आर श्रीजन रेड्डी
---------------

श्रीलेखा, कैजा, श्रीजनला दुहेरी मुकुटाचा मान
रमेश दामले स्मृती जलतरण

पुणे, ता. २५ ः पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटना (पीडीएएए) आयोजित रमेश दामले स्मृती करंडक ज्युनियर, सब ज्युनिअर व वरिष्ठ गटाच्या जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत श्रीलेखा पारीख, कैजा शंकर आणी आर. श्रीजन रेड्डीने दोन गटात विजेतेपद पटकाविताना दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टिळक जलतरण तलावावर गुरुवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात चॅम्पियन ॲक्वेटिक क्लबच्या कैजा शंकरने १०० मीटर फ्री स्टाइल (१.०५.२१ सेकंद) आणी २०० मीटर बटरफ्लायमध्ये (२.४७.८१ सेकंद) प्रथम स्थान मिळविले.
वरिष्ठ महिला गटात ब्लू वॉटर स्पोर्ट्स अकादमीच्या श्रीलेखा पारीखने ५० मीटर बॅकस्ट्रोक (३१.८२ सेकंद) आणी अठरा वर्षांखालील मुलींच्या गटातही ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये (३१.८२ सेकंद) प्रथम स्थान मिळविले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या आर. श्रीजन रेड्डीने ५० मीटर बॅकस्ट्रोक वरिष्ठ पुरुष आणी अठरा वर्षांखालील मुले या दोनही गटात (२८.४४ सेकंद)
प्रथम स्थान मिळविले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय जलतरणपटू मनोज एरंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील पांडे-लोहगांवकर आणि स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर हे उपस्थित होते.
निकाल :
५० मीटर बॅकस्ट्रोक ः सोळा वर्षाखालील मुले ः ः(२८.२२ सेकंद) अर्णव कडू, वरद कदम, आरुष जाधव. मुली ः (३३.७२ सेकंद) साराक्षी दांगट, अन्वी विश्नोई, सई दिघे.
अठरा वर्षांखालील मुले ः (२८.४४ सेकंद) आर श्रीजन रेड्डी, वेदांत तांदळे, नील बऱ्हाणपूरकर. मुली ः (३१.८२ सेकंद) श्रीलेखा पारीख, श्रिया खवले, अलिशा आहेर. वरिष्ठ पुरुष गट : (२८.४४ सेकंद) आर श्रीजन रेड्डी, वेदांत तांदळे. वरिष्ठ महिला गट ः (३१.८२ सेकंद) श्रीलेखा पारीख, भक्ती वाडकर, साराक्षी दांगट.
शंभर मीटर फ्री स्टाईल ः चौदा वर्षांखालील मुली : (१.०५.२१ सेकंद) कैजा शंकर, अनुष्का विजापूर, सलोनी साळुंखे. नऊ वर्षाखालील मुले ः (१.२४.३७ सेकंद) अर्जुन कुरुडकर, विराज पाटील, कबीर साळवे. मुली ः (१.१९.८४ सेकंद) परिणया घाडगे, श्रीनिका बेजगमवार, इरा चोबे.
दोनशे मीटर बटरफ्लाय ः चौदा वर्षांखालील मुले ः आयुष राजापूरे, रुद्र वाडकर, संभव पाटील. मुली ः (२.४७.८१ सेकंद) कैजा शंकर, सई मुंडे, वृंदा वाणी.
सोळा वर्षाखालील मुले ः (२.२०.६६ सेकंद) आदित्य बर्गे, सोहम वाळके, वरद मारणे. मुली : (२.३२.०८ सेंकद) त्विशा दिक्षित, शैली बेहेरे, आस्था धर्माले.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT