sayaji shinde sakal
पुणे

Sayaji Shinde : शिक्षकांनी त्यांच्या वयाइतकी झाडे लावावीत

प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय जीवनात एक तरी झाड लावावे आणि दहावीपर्यंत ते झाड जपण्याची जबाबदारी स्विकारावी, असा सल्ला शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना या वेळी दिला.

सकाळ वृत्तसेवा

प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय जीवनात एक तरी झाड लावावे आणि दहावीपर्यंत ते झाड जपण्याची जबाबदारी स्विकारावी, असा सल्ला शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना या वेळी दिला.

पुणे - पूर्वीच्या काळी शालेय जीवनातच विविध झाडे आणि त्यांच्या बियांची ओळख व्हायची. सध्या शालेय विद्यार्थ्यांना बिया माहित नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्षाला किमान ५० बियांची माहिती करून द्यावी आणि प्रत्येक शिक्षकाने किमान आपापल्या वयाइतकी झाडे लावावीत, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी केली. पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण आज सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय जीवनात एक तरी झाड लावावे आणि दहावीपर्यंत ते झाड जपण्याची जबाबदारी स्विकारावी, असा सल्ला शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना या वेळी दिला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे, नाट्यस्पर्धेचे कार्याध्यक्ष हनुमंत कुबडे, प्रा. महेश शेंडकर, प्रभाकर क्षीरसागर, आदी उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले, ‘‘शालेय विद्यार्थ्यांना बिया, झाडे-झुडपे, गवते याची माहिती द्यावी व त्याविषयी जाणीव जागृती निर्माण करावी.’’ संतोष देशमुख व गीता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पिंपरीतील शाळेला जनरल चॅम्पियनशिप

यशवंतराव चव्हाण शालेय नाट्यस्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदुस्तान अँटिबायोटिक हायस्कूल या शाळेला प्रदान केली. आंतरशालेय नाट्यस्पर्धेमध्ये सांघिक, दिग्दर्शन, नाट्यलेखन, नेपथ्य आदी गटांत पारितोषिके दिली. या वेळी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकांचे वितरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT