पुणे

समुपदेशनातून शिक्षकांना पसंतीच्या शाळा

CD

पुणे, ता. १७ : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद, गुणवत्तेनुसार पसंतीची शाळा निवडण्याची उत्सुकता आणि नव्या गावात रुजू होण्याची हुरहूर अशा संमिश्र भावनांनी पुणे जिल्हा परिषदेचा परिसर गुरुवारी गजबजून गेला. पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ३९५ उमेदवार समुपदेशनासाठी पात्र ठरले होते, त्यापैकी ३९२ उपस्थित उमेदवारांनी गुणवत्तेनुसार उपलब्ध शाळांची निवड केली.
जिल्हा परिषदेने रिक्त पदांपैकी ८० टक्के जागांसाठी पवित्र पोर्टलवर मराठी माध्यमाच्या ५९३ आणि उर्दू माध्यमाच्या सहा अशा एकूण ५९९ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. पहिल्या टप्प्यात मराठी माध्यमासाठी ४३६ उमेदवार उपलब्ध झाले. यामध्ये पदवीधर विज्ञान विषयाचे २०२, उपशिक्षक (मराठी) २२५ आणि उपशिक्षक (इंग्रजी) नऊ उमेदवारांचा समावेश आहे. समुपदेशनासाठी गुरुवारी सकाळच्या सत्रात २३४, तर दुपारच्या सत्रात २०२ उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी अनुक्रमे २१० आणि १८५ उमेदवार पात्र ठरले.
दरम्यान, नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणारे उमेदवार आणि त्यांचे पालक सकाळपासूनच जिल्हा परिषद परिसरात दाखल झाले होते. समुपदेशन प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले उपस्थित होते.


पवित्र पोर्टलअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून इथपर्यंत आले असून, आज शिक्षिका म्हणून नोकरी मिळाल्याचे समाधान आहे.
- वैशाली मुढे-मोटे, निवड झालेल्या शिक्षिका

शाळांची निवड करताना सोप्या क्षेत्रातील १५ किंवा त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या, तसेच अवघड क्षेत्रातील १० किंवा त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना प्राधान्य देण्यात आले. शून्य शिक्षक असलेल्या शाळांचाही समुपदेशनासाठी समावेश करण्यात आला.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्ह्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या ३९२ शिक्षकांची समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये २०८ उपशिक्षक आणि १८४ पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. नव्याने नियुक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करावे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

दृष्टिक्षेपात...
पवित्र पोर्टलद्वारे मिळालेले शिक्षक - ४३६
पात्र ठरलेले उमेदवार - ३९५
समुपदेशनाला उपस्थित उमेदवार - ३९२
अपात्र ठरलेले उमेदवार - ४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT