case  Sakal
पुणे

पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरी

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला आवडतेस. मला तुला काही सांगायचे आहे, असे म्हणून तीला बहिणीच्या घरी नेले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘माझे तुझ्यावर प्रेम (Love) आहे. तू मला आवडतेस. मला तुला काही सांगायचे आहे,’’ असे म्हणून अल्पवयीन मुलीला बहिणीच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार (Rape) करणाऱ्यास न्यायालयाने (Court) दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि ६८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.

अश्पाक सलीम बागवान (वय २८, रा. मिठानगर, कोंढवा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १६ वर्षीय मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जून २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. मुलगी शाळेत जात असताना बागवान हा तिचा पाठलाग करायचा. घटनेच्या दिवशी त्याने तिला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला आवडतेस. मला तुला काही सांगायचे आहे,’ असे तिला सांगितले.

त्यानंतर बागवानने मुलीला त्याच्या बहिणीच्या घरी नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यानंतरही आरोपी मुलीला त्रास देवू लागल्याने याबाबत मुलीच्या आईने तक्रार दिली.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे आणि ॲड. मिलिंद दातरंगे यांनी पाहिले. पोलिस हवालदार महेश जगताप आणि पोलिस नाईक अंकुश केंगले यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंडाच्या रकमेपैकी ३५ हजार रुपये मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT