crime sakal
पुणे

पुणे : ७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन बालके ताब्यात

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सीआयडी मालिका पाहून रचला खूनाचा कट

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सीआयडी मालिका पाहून खुनाच कट रचून ७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगणे खुर्द येथे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी खून करून चोरी केल्याची घटना घडली होती. शालिनी बबन सोनवणे (वय ७०, रा. सायली हाईट्स, फ्लॅट नं.७, हिंगणे खुर्द, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, हिंगणे खुर्द येथे घरामध्ये चोरी झाली असून, वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याची माहिती ३० ऑक्टोबर २०२१ रोजी नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नसल्याने सीसीटीव्हीचे फुटेजच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिराजवळ पाणीपुरी खाऊन दोघेजण गडबडीने जात असल्याची माहिती लहान मुलांकडून मिळाली.

त्या माहितीच्या आधारे दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. वृद्ध महिलेकडे पैसे असून, ते कोठे ठेवले याबाबती माहिती होती. विधिसंघर्षित बालकांनी दोन महिन्यापूर्वी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचला आणि घराची चावी चोरली. वृद्ध महिला टीव्ही पाहत असताना पाठीमागून ढकलून नाक-तोंड दाबून खून केला. त्यानंतर ९३ हजार रुपये रोख ६७ हजार रुपयांचे दागिने असा एकूण एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावेळी हाताचे ठसे कोठे उमटू नये म्हणून हँडग्लोज वापरल्याची विधिसंघर्षित बालकांनी दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले,पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, सुहास मोरे, इंद्रजीत जगताप, अमोल पाटील, सागर भोसले, विकास बांदल, विकास पांडोळे, अमित बोडरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT