crime Sakal
पुणे

पुणे : टेम्पो चालकास जबर मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

हि घटना 19 फेब्रुवारी रोजी कात्रज येथील निंबाळकर वस्ती येथे घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मार्केट यार्ड येथून घरी जाणाऱ्या टेम्पोचालकाने अचानक आलेल्या टोळक्‍याला बाजुला होण्यास सांगितल्याच्या रागातुन टोळक्‍याने टेम्पोचालकास जबर मारहाण करीत डोक्‍यात दगड घातला होता. या प्रकरणातील सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने अटक केली. हि घटना 19 फेब्रुवारी रोजी कात्रज येथील निंबाळकर वस्ती येथे घडली होती.

विकी ऊर्फ विकास जाधव (वय 28, रा.गुजर निंबाळकर वस्ती, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापुर्वी दयानंद भीमराव सीतापरराव (वय 30), सुमीत भीमराव सीतापरराव (वय 24, रा. निंबाळकर वस्ती, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) यांना अटक केली आहे. याप्रकरणी अभिजित दिघे (वय 35 , रा. भारतनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी हे 19 फेब्रुवारी रोजी रात्री मार्केट यार्ड येथील काम संपवून त्यांच्या टेम्पोतुन घरी येत होते. त्यावेळी कात्रज येथील भारतनगर, निंबाळकरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा टेम्पो आला. तेव्हा, रस्त्याच्यामध्ये आलेल्या टोळक्‍यास त्यांनी बाजुला व्हा, असे सांगितले. त्याचा राग आल्याने टोळक्‍याने त्यांना शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्‍यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांना वाचविण्यासाठी त्यांनी पत्नी तेथे आली. तेव्हा त्यांनाही शिवीगाळ करीत, त्यांना व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तसेच "आम्ही इथले भाई आहोत, जेलमधून सुटून आल्यावर तुम्हाला संपवू' अशी धमकीही त्यांनी दिली होती. या घटनेनंतर दोन आरोपींना पोलिसांनी पकडले, तर जाधव हा शहराबाहेर पळून गेला होता, तसेच तो काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत सातारा जिल्ह्यातील दहिवडी, फलटण, माण या भागात पेहराव बदलून राहात होता. दरम्यान, तो सातारा जिल्ह्यातील माण येथील बिजवडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी ऋषिकेश भोसले यांच्या शेतातुन ताब्यात घेतला.त्यानंतर त्यास भारती विद्यापीठ पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी सुपुर्द केला. जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी,सिंहगड रस्ता, हिंजवडी व अन्य पोलिस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहेत. हि कारवाई पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलिस कर्मचारी नामदेव रेणुसे, किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : सपा नेते अबू आझमी यांचे गोवंडी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन

Pimpri Chinchwad News : अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’; हिंजवडी–ताथवडे पट्ट्यात महिनाभरात दोघींचा मृत्यू!

Sweetlime Rate Decrease : मोसंबी नऊशे रुपये, तर कापुस सात हजार रुपये प्रति क्विंटल

Gadchiroli Premier League: गडचिरोलीत पुन्हा रंगणार क्रिकेटचा उत्सव; महिला क्रिकेट संघाचाही होणार समावेश!

SCROLL FOR NEXT