चाकण, ता. २५ : बालरंगभूमी परिषद पुणे व पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित स्व. मनीषाताई भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत खेड तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या विद्यार्थ्यांची पिंपरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
चाकण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील सरकारी व खासगी शाळांमधील २०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी नगराध्यक्षा मनिषा गोरे यांनी विजेत्यांचे कौतुक करत चाकणमध्ये लवकरच नाट्यगृह उभारण्याचे आश्वासन दिले. गीतकार हरिदास कड यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासावर भर दिला, तर नाटककार दीपक मांडेकर यांनी बालवयातील कलेचे महत्त्व विशद केले. पालक ॲड. पुष्कराज परदेशी यांनीही पालकांच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे परीक्षण अरुण पटवर्धन, मनोज डाळिंबकर, पंकज चव्हाण व संपदा देवधर यांनी केले. या वेळी उपनगराध्यक्षा जयश्री नायकवाडी, दीपाली शेळके, सुनील रायकर, मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे, पुष्कराज परदेशी, नाट्य कलाकार दत्तात्रेय थिटे, कुरुळीचे केंद्रप्रमुख सुनील रायकर, कुसुम करपे, प्रियांका शिंदे, मनीषा व्यवहारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उपाध्यक्ष नारायण करपे यांनी केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी
निवड झालेले विद्यार्थी
गट १ : हर्षराज परदेशी, प्रांजल गुंजळवाड, योगा नवले, ओवी चव्हाण.
गट २ : मंत्रा डुंबरे, जान्हवी पाटील, श्रावणी जाधव, आर्या शेटे, आरव कराळे.
गट ३ : त्रिवणा पाटील, सिद्धी एकशिंगे, ध्रुव ढोबळे, श्रीतिका व्यवहारे, मधुरा शिंदे, रिद्धेश बोऱ्हाडे, सिद्धार्थ गायकवाड.
गट ४ : श्रेया मेदनकर, सई गायकवाड, खुशी कोहिनकर, प्रणाली काठे, गौरी डाखोरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.