पुणे

रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडी ठेवणे पडले महागात; 3 लाखांचा ऐवज लंपास

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : रात्रीच्यावेळी होणाऱ्या प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक घराच्या खिडक्या उघड्या ठेवून झोपतात, अशाच प्रकारे एका बंगल्याच्या उघड्या खिडकीतून रात्रीच्यावेळी घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 4 मे रोजी मध्यरात्री लोहगाव परिसरात घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील प्राईम डायमंड रिजेन्स या रो हाऊस असलेल्या भागातील क्रमांक 5 येथे 4 मेच्या मध्यरात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी तेथील त्यांच्या बंगल्यामध्ये राहतात. 4 मे रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी झोपले होते. त्यावेळी चोरट्यानी बेडरूमच्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील २५ हजार रूपये, सोने व चांदीचे दागिने असा तीन लाख सहा हजार रूपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे. याप्रकरणाचा तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

रात्री झोपताना दारे-खिडक्या बंद करण्यास विसरु नका

दिवसभर असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे रात्रीही हवेत मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतो. परिणामी नागरिक घराची दारे-खिडक्या उघडे ठेवून झोपतात. त्यामुळे चोरांना चोरी करण्याची संधी मिळते. म्हणूनच नागरिकांनी रात्री झोपताना दारे व खिडक्या बंद कराव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

SCROLL FOR NEXT