अटक sakal
पुणे

पुणे : पीएमपीमध्ये चोरी करणाऱ्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन अटक

आरोपी मोबाईल चोरी करणाऱ्यां टोळीतील सदस्य, 38 मोबाईल व कार असा 15 लाखाचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल व अन्य मौल्यावन वस्तु चोरणाऱ्या एका चोरटयास अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केलेला चोरटा हा कर्नाटकातून कारने पुण्यात येत शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्य आहे. पोलिसांनी त्याच्याकडुन चोरीचे ३८ मोबाईल व एक कार असा १५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागेश आप्पाना (वय २५, रा. आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात मागील काही महिन्यापासून मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात होता.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड व सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी स्वारगेट येथील पीएमपी बस स्थानकाजवळ कर्नाटक राज्याची नंबर प्लेट असलेली एक कार संशयास्पदरित्या उभी असलेली दिसली. तसेच कारजवळची व्यक्ति पोलिसांना पाहून दूसरीकडे गेली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले. मात्र त्यास केवळ तेलगु भाषा येत असल्याने पोलिसांनी दुभाषकामार्फत त्याची चौकशी केली. तसेच त्याच्याकडील कारची तपासणी केली, तेव्हा पोलिसांना कारमधील एका पिशवीत ३८ मोबाईल आढळून आले. सर्व मोबाईल हे चोरीचे असून ते त्याच्या साथीदारांमार्फत पीएमपीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचे सांगितले.

आरोपींचे साथीदारा असून ते टोळीने मोबाईल चोरीचे गुन्हे करीत असल्याचे चौकशीत पुढे आले. त्याच्याकडे सापडलेले बहुतांश मोबाईल हे महागडे असून त्यापैकी १५ मोबाईलचे मालक भेटले आहेत.पोलिसांनी आरोपीला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्य हद्दीतील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याचा तपास गुन्हे शाखा युनिट दोनकडे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma:'नाही... नाही...' गिल ओरडत राहिला, पण रोहित ऐकला नाही; धावबाद होताच रोहित तापला म्हणाला...

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

BMC Action: 'त्या' कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड! एआय प्रणालीचा वापर, बिलांमधून दंडाची वसुली सुरू

SCROLL FOR NEXT