pune sakal
पुणे

Pune : निरवांगीमध्ये चाेरट्यांचा धुमाकुळ

एटीएम व सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथे अज्ञात पाच चाेरट्यांनी गॅस कटर साहय्याने एटीएम व सोन्या चांदीचे सराफी दुकान फोडून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे चोरट्यांना गावातून पळ काढला.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये नीरा नदीच्या तीरावरती निरवांगी गाव आहे. सोमवार (ता.२०) रोजी अज्ञान पाच चोरट्यांनी निरवांगी गावामध्ये धुमाकुळ घातला. सुमारास पहाटे तीन वाजण्याच्याएटीएम चे शटर उचकाटून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एटीएमच्या कॅमेऱ्यावरती काळ्या रंगाचे वंगन टाकून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याचा प्रयत्न केला. एटीएमचे मशिन गॅस कटरच्या साहय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नसल्याने चोरट्यांनी संतोष गुरव यांच्या ओम ज्वेलर्स दुकानाकडे मोर्चा वळविला.

गुरव यांच्या दुकानाचे शटर उचकाटून आतमध्ये एका चोरट्याने प्रवेश केला होता. उर्वरित चोघे जण दुकानाच्या बाहेर पाळतीवर होते. मात्र दुकाना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना शटर उचकटण्याचा आवाज आल्याने त्यांनी दुकानदार गुरव व गावातील नागरिकांना गावामध्ये चोर आले असून गुरव यांचे सराफी दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

गावातील ग्रामस्थांनी तातडीने दुकानाकडे दुचाकीवरुन धाव घेतली. नागरिक दुकानाकडे येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी धुम ठोकली. ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे सोने,चांदीच्या दुकानामध्ये होणारी चोरी रोखली गेली. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून तपासाला सुरवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP vs Raghav Chadha : राघव चढ्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात, 'आप'चे आपल्याच खासदारावर गंभीर आरोप

School Development: शासनाचा निर्णय! माजी विद्यार्थ्यांच्या बळावर होणार शाळांचा कायापालट; शाळांमध्‍ये संघाची स्थापना..

Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"

Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

SCROLL FOR NEXT