arrest 
पुणे

पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक 

सकाळ डिजिटल टीम

येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सराईत चोरट्याने दुसऱ्याच दिवशी घरफोडी करत तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल चोरला. त्यानंतर चोरीचा माल घेऊन गावाकडे पळून जाताना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाकडून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून १२ लाख ६० हजार रुपयांचं २८ तोळं सोनं जप्त केलं. 

जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असं अटक केलल्या सराईत चोरट्याचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात एक महिन्यापूर्वी पोलिसांनी त्याला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी केली होती. 

काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून बाहेर पडला. त्यानंतर एक दिवस आराम केल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी केली. त्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी तो थेट हडपसरमधून वाहनाने सोलापूरला त्याच्या गावी जाणार होता.
 
दरम्यान, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसरमध्ये येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने हडपसरमध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच झडतीमध्ये त्याच्याकडे १२ लाख ५० हजार रुपयांचे २८ तोळं सोनं जप्त करण्यात आलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT