पुणे

तिसऱ्या मार्गिकेसाठी जोडणी तोडली हडपसर ते घोरपडी यार्ड ः चार ऑक्टोबर दरम्यान ‘ब्लॉक’

CD

पुणे, ता. १९ ः हडपसर ते घोरपडी यार्ड दरम्यान असलेली तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी शनिवार (ता. १९) पासून कामाला सुरुवात झाली. यासाठी रेल्वेने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान ब्लॉक घेतला आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी १२ ते ५ या वेळेत घोरपडी यार्डाच्या बाहेर, हडपसरच्या दिशेने दोन मुख्य मार्गिकेमधील जोडणी (क्रॉसओव्हर) तोडण्याचे काम करण्यात आले. हे काम अत्यंत अरुंद जागेत सुमारे ४०० ते ५०० कामगारांनी पूर्ण केले. ब्लॉकचे पहिले पाच दिवस अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत.
हडपसर ते पुणे (जीसीएमसी) दरम्यान तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्याचे काम सुमारे १५ दिवस चालणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने दररोज सुमारे पाच तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत टप्या टप्याने कामे केली जात आहेत. पहिल्या दिवशी मार्गिकाची जोडणी काढून टाकण्यात आली तर रविवारी (दुसऱ्या दिवशी) ‘डाऊन’ मार्गिकेचे कट कनेक्शन करून ती बाजूला सरकवली जाईल. त्यानंतर सोमवारी ‘अप’ लाइनचे कनेक्शन तोडले जाईल. हे सर्व टप्पे पार पडल्यानंतर नवीन पॉईंट टाकण्याचे मुख्य काम सुरू होणार आहे.
----------
कामासाठी ४०० मनुष्यबळ
हे काम आव्हानात्मक असले तरीही रेल्वे प्रशासन आपल्या पारंपरिक व नियमित पद्धतीचा अवलंब करीत आहे. यासाठी सुमारे ४०० कामगारांची मदत घेतली जात आहे. कामाच्या ठिकाणी ‘ओएचई क्रेन’, ‘टॉवर वॅगन’ आणि ट्रॅक टॅम्पिंग मशीन या यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.
-----------
तिसऱ्या मार्गिकेचा फायदा काय ?
-हडपसर–घोरपडी तिसरी मार्गिका सुरू झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे.
-पुणे स्थानकावर दाखल होणाऱ्या प्रवासी गाड्यांचे क्रॉसिंग, खोळंबा आणि प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत.
- भविष्यात हडपसरहून अधिक गाड्या चालविण्यासाठीही या मार्गिकेमुळे अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल.
- प्रवासी गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी मालगाड्या अनेकदा लूप लाइनवर अडवून ठेवल्या जातात. अतिरिक्त मार्गिकेमुळे मालगाड्यांची वाहतूकही विनाअडथळा होऊ शकेल.
---------
‘‘हडपसर ते घोरपडी यार्ड दरम्यान तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती कामे करणे आवश्यक आहे. यासाठी १५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला. पहिल्या दिवशी क्रॉसओव्हर काढून टाकण्यात आला आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांना देखील फायदा होणार आहे.
-हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग,पुणे.
फोटो ः 51439

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

'सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत'; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT