yerawada-central-jail
yerawada-central-jail sakal
पुणे

Yerawada Jail : येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यु; अकस्मात मृत्युची नोंद

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, तिन्ही कैद्यांचे मृत्यु हे वेगवेगळ्या आजारपणातुन झाले असल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा कारागृहात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

संदेश अनिल गोंडेकर (वय 26, रा. डोणजे, हवेली), शाहरूख बाबू शेख (वय 29, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय 32, रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यु झालेल्या कैद्यांची नावे आहेत. गोंडेकर यास 2018 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबर रोजी त्याचे वडील त्यास भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. त्यावेळी त्यांना हवेली पोलिस ठाण्यामार्फत त्यांच्या मुलाचा मृत्यु झाल्याची बातमी समजली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मृत्युप्रकरणास कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदविला. त्यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यु "लिव्हर सोरायसीस' मुळे झाल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ या दोन्ही कैद्यांना देखील विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. त्यातुनच त्यांचा मृत्यु झाला. त्याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाच्यावतीने संबंधितांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यांमार्फत कळविले आहे. दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

'येरवडा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी संदेश गोंडेकर, शाहरूख शेख व रंगनाथ दाताळ या तीन कैद्यांचा मृत्यु झाला आहे. तिन्ही कैद्यांना विविध प्रकारचे आजार होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. संदेश गोंडेकर याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्युबाबत शंका होती, त्याबाबत डॉक्‍टरांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मृत्युचे कारण सांगण्यात आले आहे.'

- बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT