छत्रपती संभाजीराजे sakal
पुणे

Pune : ‘पर्यटन नाही, गडकोटांचे संवर्धन महत्त्वाचे’; छत्रपती संभाजीराजे

मात्र प्रत्यक्षात त्यांच्या जतन व संवर्धनासाठी कोणी काहीच केले नाही,

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतरही राज्यातील गडकोटांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सगळे राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांची नावे घेतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या जतन व संवर्धनासाठी कोणी काहीच केले नाही, अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी (ता. १६) व्यक्त केली. तसेच, सरकारची किल्ल्यांची दत्तक योजना फक्त पर्यटन वाढवण्यासाठी आहे. मात्र गड-किल्ल्यांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन-संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुरज गुरव लिखित आणि बायफोकल्स पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाच्या सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ दुर्गअभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, लेखक सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, वनविभागाचे उप-वनसंरक्षक राहुल पाटील, ‘राज्य उत्पादन शुल्क, पुणे’चे अधीक्षक चरणसिंह राजपूत, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुरातत्व संशोधक तसेच दुर्ग अभ्यासक सचिन जोशी आदी उपस्थित होते.

रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, मात्र नोकरशाहीच्या विविध जटील नियमांमध्ये गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. ‘या पुस्तकात मी महाराजांचा अप्रकाशित इतिहास आणि घटनांचा अधिकाधिक समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे’, असे लेखक गुरव यांनी सांगितले.

राज्य सरकारतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचा सत्कार, सन्मान केला जातो. परंत, पदरमोड करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी एकही पुरस्कार किंवा गौरव नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने तरी गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार व्हावा. ः प्रा. प्र. के घाणेकर, ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT