पर्यटकांचा ओढा ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टकडे  sakal
पुणे

पर्यटकांचा ओढा ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टकडे

पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, पानशेत, माळशेज घाट, लोणावळा कार्ला, कोयनानगर, भीमाशंकर या सात रिसॉर्टस॒कडे पर्यटकांचा ओढा

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजा औरच! त्यात सरकारी कार्यालयांना सलग सुट्या...त्यामुळे पर्यटकांची पावले थंड हवेच्या ठिकाणी, समुद्रकिनारी वळू लागली आहेत. अशा रम्य ठिकाणी असलेल्या ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टस॒नाही पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, पानशेत, माळशेज घाट, लोणावळा कार्ला, कोयनानगर, भीमाशंकर या सात रिसॉर्टस॒कडे पर्यटकांचा ओढा दिसून येत आहे. सिंहगड आणि अक्कलकोट येथील रिसॉर्टही येत्या १५ दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

‘एमटीडीसी’चे रिसॉर्ट हे बहुतांश निसर्गरम्य ठिकाणी हिल स्टेशन आणि समुद्रकिनारी आहेत. प्रत्येक रिसॉर्टवर उपाहारगृहाची सुविधा, कृत्रिम रंग न वापरता चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून दिले जाते. सैन्यदलात कार्यरत सैनिक आणि सेवानिवृत्त सैनिकांसाठी रिसॉर्टवर राहण्यासाठी २० टक्के आणि सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के सवलत देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवार ते गुरुवारपर्यंत २० टक्के सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती ‘एमटीडीसी’च्या पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक हरणे यांनी दिली.

पुणे विभागातील ‘एमटीडीसी’चे रिसॉर्ट आणि वैशिष्ट्ये

  • महाबळेश्वर, जि. सातारा - थंड हवेचे ठिकाण, निसर्गरम्य ठिकाण

  • माथेरान, जि.रायगड - हिल स्टेशन, थंड हवेचे ठिकाण

  • पानशेत, जि. पुणे - व्हॅली रिसॉर्ट, पानशेत धरण, जलतरण तलाव,

  • माळशेज घाट, जि. ठाणे - उत्तुंग डोंगररांग, पावसाळी पर्यटनस्थळ, निसर्गरम्य धबधबे

  • लोणावळा-कार्ला, जि. पुणे - वॉटर पार्क, बोटिंग

  • कोयनानगर, जि. सातारा- कोयना धरण, जंगल सफारी

  • भीमाशंकर, जि. पुणे - ज्योतिर्लिंग देवस्थान, अभयारण्य

‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा आहे. सर्व रिसॉर्ट हे निसर्गरम्य ठिकाणी असून, तुलनेने दर कमी आहेत. सुरक्षितता आणि स्वच्छता यावर अधिक लक्ष दिले जाते. तसेच, १५ ते २० पेक्षा अधिक खोल्यांचे बुकिंग केल्यास २० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांचा ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टकडे कल अधिक आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक अधिकारी, पुणे विभाग, ‘एमटीडीसी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT