pune traffic diversions announced till aug 15 in wake of metro work avoid these baner routes  sakal
पुणे

Pune Metro : मेट्रोच्या कामामुळे बाणेर रस्त्यावर आजपासून वाहतुकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बाणेर रस्त्यावरील हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर शनिवारपासून (ता. १२) मेट्रोचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत बाणेर रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

बाणेर रस्त्यावरील हॉटेल ग्रीन पार्क चौक ते महाबळेश्वर हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषिजी चौकातून अभिमानश्री सोसायटी चौक ते बाणेर या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी बाणेर फाटा चौकातून उजवीकडे वळावे.

तेथून आयटीआय रस्त्यावरील परिहार चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून नागरस रस्ता, महाबळेश्वर हॉटेलजवळून वाहनचालकांना बाणेर रस्त्यावर जाता येईल.

तसेच, ग्रीन पार्क हॉटेल चौकातून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे रामनदीवरील पुलावरुन उजवीकडे वळावे. तेथून वाहनचालकांनी पासपोर्ट कार्यालयासमोरुन बाणेर रस्त्यावरून इच्छितस्थळी जाता येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT