traffic rules Sakal
पुणे

Pune Traffic : वाहतुकीच्या प्रश्नांमुळे पुणेकर निराधार झाले आहेत !

पुणेकरांचा ‘माईंड गेम’ किती काळ सुरू ठेवणार ? विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सवाल !

- मंगेश कोळपकर

पुणे : शहराभोवतालच्या चारही रस्त्यांवर रोज असलेली वाहतूक कोंडी, विमानतळ, रिंग रोड आदी विविध प्रश्न विस्तारणाऱ्या पुण्याचे वाढत आहे. पुणे हे मेट्रो शहर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्यामुळे प्रलंबित प्रश्नांमुळे पुणेकर निराधार झाले आहेत, असे वाटत आहे. पुण्याच्या प्रश्नांकडे म्हणावा तितका पाठपुरावा होत नसल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी येथे नापसंती व्यक्त केली. या शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी एकमुखी नेतृत्त्वाची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

विधीमंडळाच्या कामकाजाबद्दलची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. पुण्याच्या प्रश्नांबाबत विधी मंडळाच्या १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अधिवेशनात फारसे प्रश्न उपस्थित झाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. शहराच्या रेंगाळलेल्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नियुक्त झाल्यावर पुण्यातच बैठक घेणार असून त्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या वाहतूक सुधारणांना प्राधान्य मिळण्याची गरज आहे. त्यासाठीचे अनेक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यांची मांडणी प्रभावीपणे करून पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील खासदार, आमदार, नगरसेवकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. तसेच शहरात एकमुखी नेतृत्त्वाचा अभाव असल्यामुळे काही प्रश्नांची सोडवणूक होण्यास मर्यादा असल्याचेही मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महापालिका स्तरावरही निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विचारात घ्यायला पाहिजे.

कोणीही उठतो आणि कोणतेही फलक लावतात, पुणेकरांची अडवणूक करतात. अधिकारी परस्परस निर्णय घेतात, हे कशाचे लक्षण आहे ? पुणेकरांचा ‘माईंड गेम’ किती काळ सुरू ठेवणार, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांच्या भावना समजून घेतील आणि या बाबत तातडीने निर्णय घेतील, अशी अपेक्षाही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT