Khed sakal
पुणे

Pune : भोरवाडी मंचर भागात वाहतूक कोंडीचा फटका, महिला व लहान मुलांचे हाल. पोलीसही हातबल

शासकीय कार्यालय सोमवारपासून सुरू होणार आहेत

डी.के.वळसे पाटील

मंचर : खेड ते सिन्नर बाह्यवळण रस्त्यावरून पुण्याहून नाशिकला जाणारी वाहतूक सुरू होती. पुण्याकडे जाणारी वाहतूक मंचर शहरातून जुने पुणे- नाशिक रस्त्याने सुरू ठेवली होती. पण पुण्याकडे जाणारी अनेक वाहने बाह्य वळण रस्त्याने गेल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका भोरवाडी-गायमुख (ता.आंबेगाव) येथे बसला. त्यामुळे तब्बल दीड ते तीन किलोमीटर अंतरावर मंचर शहरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

दिवाळीनिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंचर पोलिसांनी व प्रशासनाने खेड ते सिन्नर या बाह्यवळण रस्त्याने एकेरी मार्गाने नाशिक बाजूला जाणारी वाहतूक वळवण्यात आली होती. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या पुणे नाशिक रस्त्याने मंचर शहरातून जात होती. दिवाळी सणात या भागात कोठेही वाहतूकुंडीचा फटका बसला नाही. पण शनिवार (ता 29)पासून अनेक वाहनचालक पुण्याला जाताना मंचर शहरा ऐवजी बाह्यवळण रस्त्याने जात होते. त्यामुळे भोरवाडी-गायमुख ( तालुका आंबेगाव )जवळ वाहतूक कोंडी गेले दोन ते तीन दिवस सतत सुरू आहे.

शासकीय कार्यालय सोमवारपासून सुरू होणार आहेत. तसेच अनेक जण सुट्टीवरून माघारी येजा करतात. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांचे संकेत तीन ते चार पटीने वाढ झाली. सध्या तीस ते पस्तीस हजार वाहने या रस्त्यावरून ये जा करतात. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. वाहतूक पोलीस हतबल झाले होते. प्रवास करणारे जेष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांचे अतोनात हाल झाले. तास ते दीड तास अनेक वाहने वाहतूक कोंडीत सापडली होती असे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले .

"वाहनचालकांनी पुण्याला जाताना बाह्य वळण रस्त्या ऐवजी मंचर शहरातून जावे "असे आव्हान मंचर पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे पोलीस नाईक मंगेश लोखंडे यांनी केले आहे.

भोरवाडी- गायमुख ( ता.आंबेगाव): पुणे- नाशिक जुन्या रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT