pune Traffic jams due to religious festivals holidays and wedding shopping  sakal
पुणे

Pune Traffic : धार्मिक सण, सुट्ट्या व लग्नसराईच्या खरेदीमुळे वाहतुक कोंडी

अक्षय्य तृतीया, रमजान ईद यासह विविध धर्मांचे धार्मिक सण व त्यांना जोडून आलेली शनिवारची सुट्टी, लग्नसराईची खरेदी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नागरीकांनी खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लग्नसराई, विविध धर्मीय धार्मिक सण, खरेदी व दर्शन घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे सायंकाळी मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने नागरीक त्रस्त झाले.

शनिवारी सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नागरीकांची गर्दी वाढू लागली होती. अक्षय्य तृतीया, रमजान ईद यासह विविध धर्मांचे धार्मिक सण व त्यांना जोडून आलेली शनिवारची सुट्टी, लग्नसराईची खरेदी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नागरीकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दरम्यान, नागरीकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत मध्यवर्ती भागातील गणपती मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले.

सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हि गर्दी वाढली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, शनिपार चौक, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता अशा भागामध्ये वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे दुचाकी, रिक्षा व कार चालकांनी अंतर्गत भागातील रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र तेथेही कोंडी झाल्याने नागरीकांना गर्दीतून बाहेर पडता न आल्याने नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त होते. विश्रामबाग व फरासखाना वाहतुक पोलिस शाखेकडून गर्दी असणाऱ्या व वाहतुक कोंडी झालेल्या ठिकाणी अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहतुक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT