traffic  sakal
पुणे

Pune traffic : खडकवासला धरण चौकात मोठी वाहतूक कोंडी

वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे चौपाटीही हाऊसफुल्ल

निलेश बोरुडे

किरकटवाडी : शाळांना लागलेली उन्हाळ्याची सुट्टी, शनिवारी रमजान व रविरची सुट्टी यांमुळे खडकवासला परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून खडकवासला धरण चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. खडकवासला ते डिआयएटी, खडकवासला ते कोल्हेवाडी व खडकवासला-एनडीए रस्ता अशा सर्व बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे.

खडकवासला धरण चौपाटीही हाऊसफुल्ल झालेली दिसत आहे. चौपाटी परिसरात अनेक पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खडकवासला गावातून पुढे सिंहगड, पानशेतकडे जाणाऱ्या व येणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच विवाह सोहळे, बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त सुरू असलेले प्रचार दौरे यांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडताना दिसत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी पाठविण्यात आल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

धरण चौकात वाहने घासत असल्याचा परिणाम...... धरण चौकापासून पुढे कॉंक्रिटीचा रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु ज्या ठिकाणी रस्ता सुरु होतो तेथे योग्य प्रकारे भर न टाकण्यात आल्याने चारचाकी वाहने घासत आहेत. वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनचालकांना येथून सावकाश वाहने काढावी लागत असल्याने त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

"वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात आहेत मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने व रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाठवले आहे." सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT