Pune Traffic News sakal
पुणे

Pune Traffic News : विद्यापीठ चौकात काहीसा दिलासा ; पोलिसांकडून वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आनंदऋषिजी महाराज चौकातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने वाहतूक पोलिसांनी काही नवे बदल केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आनंदऋषिजी महाराज चौकातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने वाहतूक पोलिसांनी काही नवे बदल केले आहेत. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मिलेनियम गेटचा (चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन) वापर सुचविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शनिवारी सकाळपासूनच नव्या बदलांची अंमलबजावणी सुरू झाली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील वळण अडथळे लावून बंद करण्यात आले. बाणेर रस्त्यावरील हाय स्ट्रीट ते विद्यापीठापर्यंतच्या भागात मेट्रोने बॅरिकेड््स आत ओढून घेतले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी थोडी जास्त मोकळी जागा मिळण्यास मदत झाली. औंधकडून शिवाजीनगरकडे येणारी जड वाहनांची वाहतूक ब्रेमेन चौकातूनच वळविण्यात आली. त्यामुळेही वाहनचालकांना थोडा फरक जाणवला.

शनिवारी खासगी कार्यालयांसह काही सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने वाहतूक तुलनेने कमी होती. तरीही कोंडीच्या संदर्भात थोडासा दिलासा मिळाला. यानंतरही मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळणे किंवा कमी करणे पोलिसांसाठी प्रचंड आव्हानात्मक असेल. परिणामी वाहनचालकांच्या सहनशीलतेची परीक्षा यापुढील काळातही होईल.

पर्यायी मार्गाचा अभाव

शिवाजीनगरकडून बाणेर, औंध, बालेवाडी, बावधन, पिंपळे गुरव अथवा सांगवी आदी भागात जाण्यासाठी किंवा तिकडून शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी विद्यापीठ चौकातून जाणे हाच एक पर्याय आहे. पूर्वी मोठे पूल असूनही तेथे वाहतूक कोंडी होत होती. आता मेट्रोच्या कामामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. शहरात पर्यायी किंवा समांतर रस्ते नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

AI Prank: ‘एआय’ इमेजचा विखारी प्रँक, बनावट अजगरामुळे टेन्शन वाढलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

नवनीत राणा यांचं भाजपमधून निलंबन होणार? पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर पक्ष अ‍ॅक्शन मोडवर...

Accident News: भीषण अपघात! जेवत असलेल्या २० मजुरांना कारने चिरडले; २ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Latest Marathi Live Update : जेजुरीत कामगारांचे भीक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT