Pashan Sus Road Traffic Sakal
पुणे

Pashan Sus Road Traffic : पाषाण-सुस रोडवरची वाहतूक कोंडी सुटणार तर कधी ? वाहनांच्या लांबच लांब रांगा video viral

बेकायदा पार्किंग व्यवस्थेमुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

दत्ता लवांडे

पुणे : पुण्यातील पाषाण सुस रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल (सोमवार, ता. 24) सकाळच्या दरम्यानचा हा व्हिडिओ असून बेकायदा पार्किंगमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये हजारो वाहने अडकून पडली होती. या वाहतुककोंडीमुळे नागरिकांना जवळपास एक तास उशीर झाला आहे.

दरम्यान, "पावसाळ्यामध्ये संपूर्ण सुस गावामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तर येथील रस्त्यांची सुद्धा बिकट अवस्था असताना पुणे महापालिकेला या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात काही रस नसल्याचं दिसून येतंय. येथे झालेली वाहतूक कोंडी काहीवेळा वाहतूक पोलीस हाताळतात पण या रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज आहे. काल झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये नागरिक जवळपास ४५ मिनीटे ते एक तास अडकून पडले होते" अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

“24 जुलै रोजी सकाळी पाषाण-सुस रस्त्यावर अवैध पार्किंग, अवजड वाहने रस्त्यावर थांबणे इत्यादी कारणांमुळे 2 ते 3 किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. आता आम्ही वाहतूक सुरळीत केली आहे. आम्ही पाषाण-सुस रोडवर ट्रॅफिक वॉर्डन देखील नियुक्त केले आहेत आणि दररोज वाहतूक सुरळीत राहील याची खात्री केली जाणार आहे.” असं बावधन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT