पोलीस  sakal
पुणे

Pune traffic : कात्रज चौकात बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

चौकात अनेक रिक्षा चालक खाजगी पार्किंग असल्यासारखे गाड्या लावत असतात.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज चौकात व परिसरातील बेशिस्त व वाहतूक नियम न पाळणाऱ्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अवैध रिक्षा चालकांवर भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. कात्रज चौक परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने नो-पार्किंग नो-हॉल्टिंग करण्यात आले आहे.

या चौकात अनेक रिक्षा चालक खाजगी पार्किंग असल्यासारखे गाड्या लावत असतात. संबधित रिक्षाचालकांना सूचना देऊनही फरक पडत नसल्याने एमव्ही अॅक्टअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या माध्यमांतून एकूण २७ रिक्षा चालकांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कात्रज चौकात वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वारंवार सूचना देऊनही रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा कमी होत नव्हता. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत असल्याचे लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचे यावेळी कणसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT