Pune-Nagar-Road-Traffic 
पुणे

#PuneTraffic एक किमीसाठी सव्वा तास!

संतोष धायबर

पुणे - पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांसह अनेक वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल सव्वा तास वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीत प्रवाशांसह, विद्यार्थी, रुग्ण व डॉक्‍टरांचा जीव अडकला जात आहे. प्रशासन उद्रेकाची वाट पाहात आहे की काय? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या वाघोलीमधील वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटादरम्यान वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटादरम्यान बुधवारी (ता. ३) सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिकेलाही पुढे जाण्यास रस्ता मिळत नव्हता. रुग्णवाहिकेचा सायरन वाजून-वाजून अखेर थांबला. पुणे-नगर महामार्गावर विविध गावे वसलेली आहेत.

या गावांमधूनच रस्ते जातात. परंतु, चौकांच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी होण्यासाठी साधे पट्टेही नाहीत.  यामुळे अनेकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. 

पुणे-नगर महामार्गावरील वाघोली, कोरेगाव व शिक्रापूरमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या मार्गावर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. दीड तासाच्या प्रवासासाठी किती वेळ लागू शकेल? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. शिरूर शहरातील अनेक व्यावसायिकांनी पुणे शहराकडे पाठ फिरवली आहे. व्यावसायिकदार खरेदीसाठी नगरकडे वळाले आहेत.
- संकेत कर्नावट, व्यावसायिक 

पुणे-नगर रस्त्यावरून अनेक रुग्णवाहिका धावत असतात. नगरसह शिरूर तालुक्‍यातील अनेक रुग्णांना तत्काळ व मोठ्या उपचारासाठी रुग्णवाहिकेमधून पुण्याकडे पाठवावे लागते. यामध्ये अपघातात जखमी झालेले रुग्ण, गरोदर महिला व हृदयाचा झटका आलेल्या रुग्णांचा समावेश असतो. अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. शिवाय, पुण्याहून विविध तज्ज्ञ डॉक्‍टर रुग्णांच्या तपासणीसाठी या मार्गावरून जात असतात. वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत.
- अंकुश लवांडे, डॉक्‍टर 

तिढा सुटणार कधी?
पुणे-नगर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा. प्रचंड वाहतूक कोंडी, प्रदूषण यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवासादरम्यान प्रदूषणामुळे अनेकांना चेहरा बांधावा लागत आहे. शिवाय, प्रवासात किती वेळ जाईल, हे कोणालाच सांगता येत नाही. या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिवाय, इंधनावरही मोठा खर्च होत असून, अनेकांचा वेळ खर्च होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Agriculture Loss By Rain : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश

Pune News : निधी येऊनही शहरात पाणी का साठते? केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडून प्रशासनाची झाडाझडती

SCROLL FOR NEXT