Roads lights  sakal
पुणे

Pune : भुयारी मार्गातील समस्यांचा वाचला नागरिकांनी पाढा

स्थानिकांबरोबर वाहनचालकांची तक्रार मार्गावर पथदिवे आणि दिशादर्शक फलक लावावेत

अशोक बालगुडे

उंड्री : हडपसरमधून बारा वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या पुणे-मिरज लोहमार्गावरील सय्यदनगर आणि काळेबोराटेनगर रेल्वे गेट क्र.७ आणि ८ बंद केल्याने स्थानिक नागरिकांबरोबर वाहनचालकांना दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. काळेबोराटेनगर आणि ससाणेनगर येथील भुयारी मार्गावर पथदिवे आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

काळेबोराटेनगर येथील भुयारी मार्गातून रवी पार्कच्या पाठीमागील रस्त्याचे काम मागिल अनेक वर्षांपासून रखडले आहे. हांडेवाडी रस्त्याकडून वागजाई मंदिरापासून रवी पार्क सोसायटीच्या बाजूने असलेल्या ओढ्यावर पुल टाकला असून, अवघा काही मीटरचा लांबीचा रखडल्यामुळे वाहनचालकांना सोसायटीला वळसा घालून ये-जा करावी लागत आहे, प्रा. धर्मराज म्हेत्रे, अमोल बोराटे, संकेत डांगमाळी, योगेश न्हावले, नारायण भोंगळे, नितीन सातव, स्कूल बसचालक शंकर मिसेकर यांनी सांगितले.

सय्यदनगर रेल्वेगेटपासून महंमदवाडी-हांडेवाडी रस्त्याची वारंवार खोदाई केली जाते. मात्र, त्यानंतर दुरुस्ती करण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर येथून रवी पार्ककडे जाण्यासाठीच्या रस्त्याला नामफलक लावावा, तसेच पुढे रेल्वेगेट बंद आहे, या रस्त्याचा वापर करावा, अशी सूचना लावण्याची गरज आहे, अशी मागणी निकिता झांबरे, तृप्ती टिळेकर, मृणाल हांडे, वृषाली वाडकर यांनी केली आहे.

काळेबोराटेनगर आणि ससाणेनगर भुयारी मार्गावर अधारात लुटमारीच्या वारंवार घटना घडत आहेत. महिला-मुलींची कुचंबना होत आहे. दिशादर्शक फलक नसल्याने नवख्याची वाहनचालकांची फसगत होत असा एक ना अनेक तक्रारींचा पाढा नागरिकांनी वाचला. पालिका प्रशासनाने दोन्ही भुयारी मार्गावर पथदिवे बसावेत.

- कल्पना हांडे, हांडेवाडी

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, काळेबोराटेनगर येथील रवीपार्क सोसायटीशेजारील रस्त्याची पाहणी करून तातडीने उपाययोजना केली जाईल. भुयारी मार्गावर पथदिवे आणि दिशादर्शक फलक लावण्यासाठीची उपाययोजना केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT