Pune Traffic Update News Esakal
पुणे

Pune Traffic Update News: पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना शहरात नो एंट्री, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

Pune Traffic Update News: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरात उद्यापासून (5 मार्च) जड वाहनांना नो एन्ट्री असणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pune Traffic Update: पुणे शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर भेडसावत चालली आहे. वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. नागरिकांची होत असलेला त्रास आणि गैरसोय लक्षात घेता आता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरात उद्यापासून (5 मार्च) जड वाहनांना नो एन्ट्री असणार आहे.

पुणे शहरात पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी असणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. तसेच वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही पुणे नगर ,पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे.

या मुख्य मार्गांवर जड वाहनांना प्रवेश बंद

पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून एकाही जड वाहनाला या मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही.

या पर्यायी मार्गांचा करा वापर

  • जड वाहनांना वाघोली ते पुणे शहराच्या दिशेनं 24 तास प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येईल.

  • सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा येथून पुढे लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गे पर्यायी मार्ग आहे.

  • पुणे सासवड जड वाहनांसाठी हडपसर मार्गे थेऊर फाटा येथून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. येथून लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गाने देखील जड वाहनांना प्रवास करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT