लसीकरण sakal
पुणे

पुणे: जिल्ह्यात एका दिवसात सव्वादोन लाख लसीकरण

कोरोना लसीकरणाचा नवा उच्चांक

गजेंद्र बडे - सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून एकाच दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्याचा नवा उच्चांक मंगळवारी (ता.३१) नोंदवला गेला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण २ लाख ३४ हजार २६० नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक १ लाख ६८ हजार ५१२ जणांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात याआधी २५ जून २०२१ ला एका दिवसांत सर्वाधिक १ लाख ४३ हजार ६३९ लसीकरणाचा विक्रम नोंदला गेला होता. हा विक्रम आजच्या लसीकरणाच्या आकडेवारीने मोडीत निघाला आहे. पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यात आज बजाज ग्रुपच्या सहकार्याने कोरोना मेगा लसीकरण मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे ५५९ लसीकरण केंद्रावर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

या मेगा लसीकरण मोहिमेसाठी बजाज ग्रुपने जिल्हा परिषदेला लसीचे दोन लाखांहून अधिक मोफत डोस उपलब्ध करून दिले होते. आजच्या लसीकरण मोहिमेतील एकूण लसीकरणापैकी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये मिळून सुमारे ६५ हजार ७४८ जणांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात याआधी आतापर्यंत आठ वेळा एका दिवसांत प्रत्येकी एक लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ex-servicemen: माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून मोठी दिवाळी भेट मिळाली, कुटुंबियांनाही होणार लाभ

Ranji Trophy: ५ विकेट्स १८ धावांवर पडल्या, पण ऋतुराज गायकवाड लढला, शतकाची थोडक्यात हुलकावणी; महाराष्ट्राचे दमदार पुनरागमन

'दोन कपल्स एकाच बिछाण्यावर...' पंकज धीर यांनी देशात पहिल्यांदा बनवलेला 'अश्लील सिनेमा', हॉटेलच्या बंद रुममध्ये झालेलं शुटिंग

Land Records Surveyor Recruitment 2025: भूमी अभिलेख विभागात 903 भूकरमापक पदांसाठी भरती जाहीर, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

Latest Marathi News Live Update : पुण्यात भर रस्त्यावर तिघा जणाकडून बांबूने एका तरुणाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT