women-Atrocities 
पुणे

पुण्यात महिला अत्याचाराच्या दोन वर्षांत तब्बल एवढ्या घटना घडल्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये राज्यात १०.९५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यातच पुणे शहरातही मागील दोन वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या तब्बल १४०० घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मात्र त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून तत्काळ पूर्ण करून आरोपींना बेड्या ठोकण्यात येत असल्याची बरी स्थिती आहे. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठीही पुणे पोलिसांकडून बडीकॉप, दामिनी पथक, हेल्पलाइनद्वारे ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या २०१८ च्या गुन्हे अहवालामध्ये राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नमूद केले आहे. हे प्रमाण १०.९५ टक्के इतके वाढले आहे. त्यामध्ये पुण्यामध्ये २०१८ मध्ये महिलांवरील बलात्काराच्या २३९, तर विनयभंगाच्या ५१७ इतक्‍या घटना घडल्या, तर २०१९ मध्ये बलात्काराच्या २२४ व विनयभंगाच्या ४१९ घटना घडल्या. अशा एकूण १३९९ घटना शहरात दोन वर्षात घडल्या. परंतु या घटनांची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेत बहुतांश आरोपींना पकडण्यात यश आले आहे. त्याचबरोबर २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये बलात्काराच्या घटना किंचित कमी झाल्या, तर विनयभंगाच्या १०० हून अधिक घटना कमी झाल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते.

बडीकॉप, दामिनी पथक, महिला हेल्पलाइन, महिला साह्यता कक्ष अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर पीडित महिला, तरुणींना सर्वतोपरी मदत केली जाते. महिला, तरुणींबाबत गैरप्रकार घडत असल्यास दामिनी पथक किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी ५ ते १० मिनिटांत घटनेच्या ठिकाणी पोचून त्यांची सोडवणूक करतात. 
- वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला सहाय्यता कक्ष  

या आहेत उपाययोजना

  • शाळा, महाविद्यालयांमधील छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंधासाठी दामिनी, पोलिस काका
  • नोकरदार महिलांच्या मदतीसाठी ‘बडीकॉप’ सुविधा
  • छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी बीट मार्शलची गस्त
  • महिला, तरुणींना अडचणीच्या काळात पाच ते सात मिनिटांत मदत
  • कौटुंबिक घटनांमध्ये महिला साह्यता कक्षाद्वारे मदत
  • पीडित महिला, तरुणींचे समुपदेशन करून कायदेशीर सल्ला 

महिला हेल्पलाइन क्रमांक : १०९१
पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक : १००

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT