पुणे

लोहगावातील ११ अनधिकृत पीजी हॉस्टेल सील

CD

पुणे, ता. १८ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या अनधिकृत पेइंग गेस्ट (पीजी) आणि हॉस्टेलविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. लोहगाव आणि निंबाळकरनगर भागात तपासणीदरम्यान अग्निशामक यंत्रणा आणि महापालिकेची कोणतीही परवानगी नसलेले ११ पीजी हॉस्टेल शुक्रवारी सील करण्यात आले. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा विनापरवाना हॉस्टेलच्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
देशभरातील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या आदेशानुसार अग्निशामक केंद्राचे प्रमुख गणेश सोनुने यांच्या पथकाने लोहगाव भागात अचानक पाहणी केली. तीन ते चार मजली इमारतींमध्ये प्रत्येकी १०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी वास्तव्यास असताना तेथे कोणतीही अग्निशामक यंत्रणा नव्हती. शिवाय बांधकाम परवानगी, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रक्चरल ऑडिट आणि अग्निशामक दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अशा आवश्यक परवानग्या नसल्याचे उघडकीस आले.
तपासणीदरम्यान काही महाविद्यालयांनीच या अनधिकृत हॉस्टेलचे संदर्भ विद्यार्थ्यांना दिल्याचे समोर आले. अशा महाविद्यालयांवर आणि जागामालकांवरही कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. अग्निशामक, बांधकाम आणि अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यापुढे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि पीजींची कसून तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT