पुणे

वीजवाहिन्या होणार भूमिगत

CD

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी ते शिवशंभोनगर गल्ली क्रमांक एक या परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन कोटी ६० लाख रुपये खर्च होणार आहेत. पुढील नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील संबंधित भागात महावितरणच्या उच्चदाब आणि लघुदाब वीजवाहिन्या विद्युत खांबांवरून जात आहेत. त्या भूमिगत करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने महावितरणकडून अंदाजपत्रक मागविले होते. त्यानुसार जीएसटीसह दोन कोटी ९५ लाख २१ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. निविदा प्रक्रियेत आठ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी सात निविदाधारक पात्र ठरले. शेवाळे इलेक्ट्रिकल्स यांची जीएसटीसह दोन कोटी ५९ लाख ७५ हजार ८४३ रुपयांची निविदा स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली. या कामात २२ केव्ही उच्चदाबाच्या भूमिगत केबल, लघुदाब केबल, आरएमयू यंत्रणा, फीडर पिलर, संरक्षक पाइप आणि अर्थिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, विद्यमान विद्युत खांब काढण्यात येणार आहेत.

या कामांनाही मंजुरी
१) महापालिका शाळांमध्ये अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह विद्युत आणि नेटवर्क यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एक कोटी ९९ लाख ५५ हजार ६३७ रुपये खर्च अपेक्षित असून आयसिक्युअर आयटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. आठ महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
२) परिमंडळ चार आणि पाचमधील सात स्मशानभूमींतील गॅस शवदाहिन्यांसाठी पुढील वर्षभर एलपीजी सिलिंडर पुरविण्याच्या ९९ लाख ७२ हजार ४४८ रुपयांच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली. एलपीजीच्या दरांमध्ये केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बदल होत असल्याने प्रत्यक्ष पुरवठ्याच्या महिन्यातील लागू दरानुसार देयके दिली जाणार आहेत.

वैकुंठ स्मशानभूमीत सुधारणा
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीचा ताण निर्माण होत असल्याने तेथे विविध विकासकामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, या कामांची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये शेडची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार काँक्रिटीकरण, स्वच्छतागृहांची सुधारणा आणि पाणीपुरवठ्याच्या सुविधांचा समावेश आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT