पुणे

रिंगरोड, एचसीएमटीआरला जोडणार ‘पाताल लोक’

CD

पुणे, ता. १५ : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड), एचसीएमटीआर आणि ‘पाताल लोक’ हे चारही प्रमुख प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या एकात्मिक नियोजनामुळे शहरांतर्गत आणि बाह्य प्रवास अत्यंत सुलभ होणार असून, संपूर्ण ‘पाताल लोक’ प्रकल्पाऐवजी केवळ आवश्यक तिथेच भूमिगत रस्ते केले जाणार आहेत.

‘पीएमआरडीए’ने कात्रज ते येरवडा असा बोगद्याचा प्रस्ताव सादर करावा, तसेच या प्रकल्पाचा आराखडा तयार करावा, हा ‘ट्विन टनेल’ असावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. तसेच, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एका कार्यक्रमात त्यांनी पुण्यात ‘पाताल लोक’ करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार पीएमआरडीएने निविदा मागवून सल्लागार कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीने सर्वेक्षण पूर्ण करून यापूर्वीच प्रारूप आराखडा प्राधिकरणाला सादर केला होता. सल्लागार कंपनीने प्रारूप आराखड्यात दुमजली वर्तुळाकार मार्ग दर्शविला आहे. त्यात पुणे शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांना जोडणारा आणि सहा ते सात ठिकाणावरून ये-जा करणे शक्य होईल, असा सुमारे ५४ किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्ता प्रस्तावित केला. त्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित दर्शविण्यात आला होता.
मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, एचसीएमटीआर आणि इनर रिंगरोडला जमीनखालून जोडण्यासाठी ‘पाताल लोक’ प्रकल्पाच्या आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. एचसीएमटीआर आणि इनर रिंगरोडसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कंपनीची मध्यंतरी एक बैठक झाली. या बैठकीत या सर्व योजना एकमेकांना जोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला.

भूसंपादन अन् खर्चात बचत
‘बाह्य रिंगरोडचे काम सुरू असून, इनर रिंगरोडचे भूसंपादन प्रस्ताव सादर झाले आहेत. १९८७ च्या आराखड्यानुसार एचसीएमटीआरचे कामही सुरू झाले आहे. हे सर्व प्रकल्प ‘पाताल लोक’ प्रकल्पाशी जमिनीखालून जोडल्यामुळे भूसंपादन आणि खर्च कमी होईल, तसेच नागरिकांना उत्तम पर्यायी मार्ग मिळतील. यामुळे कमी भूसंपादन करावे लागेल आणि येणाऱ्या खर्चातही काही प्रमाणात बचत होईल,’ असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

हे प्रकल्प एकमेकांना भूमिगत जोडण्यासाठी ‘पाताल लोक’ योजना राबविण्याबाबत एकमत झाले आहे. तसेच, हे प्रकल्प एकमेकांना जोडले, तर शहरात येणे आणि शहराबाहेर जाणे सोपे होऊन वाहतूक कोंडी सुटण्यासाठी त्यांची मोठी मदत होऊ शकते. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याच्या सूचना सल्लागार कंपनीला दिल्या आहेत.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे

महत्त्वाचे...
- इनर-आउटर रिंगरोड, एचसीएमटीआर आणि ‘पाताल लोक’ प्रकल्प भूमिगत जोडले जाणार.
- ट्विन टनेल आणि दुमजली वर्तुळाकार मार्ग असणार.
- ६ ते ७ ठिकाणांवरून ये-जा करण्याची सोय.
- भूसंपादन कमी होऊन वाहतूक कोंडी सुटणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT