Pune Underground way Security sakal
पुणे

पुणे : भुयारी मार्गची सुरक्षितता रामभरोसे

पादचारी भुयारी मार्ग मध्ये घाणीचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : चंदननगर येथे पुणे महानगरपालिके कडून कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पादचारी भुयारी मार्ग मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दैनिक सकाळ मध्ये या वृत्ताची बातमी प्रसिद्ध होताच नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागा कडून दखल घेतली. संपुर्ण भुयारी मार्ग स्वच्छ करण्यात आला. परंतु रात्रीच्या वेळेस ये जा करणारे लहान मुले,जेष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षितता प्रश्न सुटला नसल्याने ' जैसे थे ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भुयारी मार्गातून ये जा करणार्‍या पादचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी बसविण्यात आलेले cctv कॅमेरे गायब झाले असल्याने लहान मुले ,महिलां, जेष्ठ नागरिकांची सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगररोड रस्ता सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये जा करता यावे यासाठी भुयारी पादचारी मार्ग बांधण्यात आला. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी

तळीराम आणि बेघर अशा अनेकांचा वावर वाढला आहे. ना सुरक्षा रक्षक ना cctv कॅमेरे त्यामुळे ये जा करणार्‍या पादचाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे. कॅमेरे चोरीला गेले तरीही प्रशासना कडून पोलिस स्टेशन ला तक्रार केली नाही. प्रशासनाच्या संबंधित विभागाने भुयारी मार्गच्या सुरक्षितता कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

रोहन मुतुंगे : कनिष्ठ अभियंता.

पूर्वी जे भुयारी मार्ग मध्ये cctv कॅमेरे बसविण्यात आले होते ते वैयक्तिक बसवले होते त्यामुळे चोरीला गेलेल्या कॅमेराची तक्रार पोलिसां स्टेशन कडे करण्यात आली नाही. लवकरात लवकर नगररोड क्षेत्रीय कार्यालय असो या नागरिकांचा सहभाग त्यांच्या मदतनिधी तून रामवाडी, विमाननगर आणि चंदननगर येथील भुयारी मार्ग मध्ये cctv बसविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT